क्राईमताज्या बातम्या

आधी प्रायव्हेट पार्ट कापला आणि नंतर…; सोलापुरमधील ही भयानक घटना

सोलापूर | सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अज्ञाताने एका तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कापून त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं तालुक्यात एकाच खळबळ उडाली आहे. संजय तुकाराम इंगोले असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. ही घटना अनैतिक संबंधातून घडली असावी असा प्राथमीक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याचं सांगोला तालुका पोलीसांनी म्हटंल आहे.

सांगोला तालुक्यातील एकतपूर – अचकदानी रोडवर एक तरुण मृत अवस्थेत पडला असल्याचं गस्तीवरील पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी मृतदेहाची पहाणी केली असता या तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कापून हत्या करण्यात आली असावी असं पोलिसांनी म्हटलं आहे. संजय तुकाराम इंगोले याची अनैतिक संबंधातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती सांगोला तालुका पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये