…म्हणून सोनम कपूरचे डोहाळे जेवण रद्द!

मुंबई | Sonam Kapoor’s Baby Shower – बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. तसंच काही दिवसांपूर्वीच सोनम कपूरच्या मित्रमैत्रिणींनी तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. नुकतंच सोनम ही लंडनहून मुंबईत परतली आहे. याच पार्श्वभूमीवर तिचे वडील अभिनेते अनिल कपूर यांनी खास डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र आता हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
ई-टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून मुंबई तसंच इतर शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे सोनम कपूरचा मुंबईत आयोजित केलेला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कपूर कुटुंबातील जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून कपूर कुटुंब सोनम कपूरच्या बेबी शॉवरची तयारी करत होते. यानिमित्ताने अनेक पाहुण्यांना आमंत्रण आणि त्यासोबत भेटवस्तूही पाठवण्यात आल्या होत्या.
येत्या 17 जुलैला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम कविता सिंह यांच्या वांद्रे येथील बंगल्यावर होणार होता. मात्र करोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे कुटुंबाची चिंता वाढली आहे. आरोग्याप्रती दक्षता बाळगून त्यांनी हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला आहे.