ताज्या बातम्या

महाशिवरात्रीनिमित्त सोनगावच्या सोनेश्वर मंदिरात यात्रेची तयारी पूर्ण

बारामती | बारामती तालुक्यातील सोनगाव येथील सोनेश्वराच्या मंदिरात महाशिवरात्रनिमित्त यात्रेची तयारी पूर्ण झाली असून 50 हजारहून अधिक भाविक दर्शनाला येणार असल्याची माहिती देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

बारामती पासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर कऱ्हा आणि नीरा नदीच्या संगमावर वसलेले सोनेश्वराचे पुरातन मंदिर आहे या मंदिरामध्ये महाशिवरात्र त्याचबरोबर श्रावणी सोमवार दिवशी अनेक भाविक हे दर्शनासाठी येत असतात महाशिवरात्री व श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी या ठिकाणी मोठी यात्रा भरते. या ठिकाणी पुणे सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यातील भाविक दर्शनासाठी हजेरी लावत असतात.

हे मंदिर दोन्ही नदीच्या संगमावर असल्याने या ठिकाणी नदीत पाणी असल्यामुळे भाविकांना होडीतून दर्शनासाठी मंदिराकडे जावे लागते त्यामुळे येणाऱ्या भाविकांना देवदर्शनाबरोबरच नौकाविहाराचा देखील आनंद मिळतो या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायत व मंदिर प्रशासनाच्या वतीने सर्व सोयी पुरवण्यात येणार आहेत.


Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये