ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

आनंदाची बातमी : गदर 2 नंतर, सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ येणार; लवकरचं होणार घोषणा

सध्या अभिनेता सनी देओलचा ‘गदर 2’ बॉक्स ऑफीसवर चांगलीच धुमाकुळ घालतोय. आवघ्या काही दिवासांपुर्वी 11 ऑगस्टला रिलीज झालेल्या या सिनेमाने कमाईचा नवीन विक्रम आपल्या नावे केला आहे. अवघ्या आठ दिवसांत ‘गदर 2’ ने 200 कोटींहून अधिकची कमाई केली. याशिवाय या चित्रपटाने अनेक विक्रमही केले आहेत.

दरम्यान, सनी देओलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच तो आणखी एका प्रसिद्ध चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. आणि हा सिनेमा म्हणजे बॉर्डर 2 असणार आहे. त्यामुळे देशावर आधारित असलेल्या या चित्रपटात सनी भुमिका महत्वाची असणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सनी देओल चित्रपट निर्माता जेपी दत्तोसोबत ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम करणार आहे. काही दिवसांपासून टीम ‘बॉर्डर 2’ वर काम करत असून येत्या आठवड्यात सिक्वेलबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये