क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

मिलर ‘किलर’ ठरणार? अख्खा संघ पडला, एकट्याने कांगारूंना घाम फोडला; 213 धावांचे आव्हान

कोलकत्ता : (South Africa Vs Australia Semi Final World Cup 2023) वर्ल्डकप 2023 च्या दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेची अवस्था 4 बाद 24 अशी केली होती. हा सामना ऑस्ट्रेलिया लिलया जिंकणार अन् अफ्रिका चोकर्सची चोकर्सच राहणार असे वाटत होते.

मात्र डेव्हिड मिलरने (116 चेंडूत 101 धावा) झुंजार शतक करत दक्षिण अफ्रिकेचे आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या शतकी खेळीत 5 षटकार आणि 8 चौकार मारले. त्याला 47 धावा करून हेन्री क्लासेनने चांगली साथ दिली. दक्षिण अफ्रिकेने 4 बाद 24 धावांवरून सर्वबाद 212 धावा केल्या.

मात्र डेव्हिड मिलर आणि हेन्री क्लासेनने पाचव्या विकेटसाठी महत्वपूर्ण 95 धावांची भागीदारी रचली अन् अफ्रिकेला शतकी मजल मारून दिली. दोघेही अर्धशतकाजवळ पोहचले होते. मात्र ट्रॅविस हेड या पार्ट टाईम गोलंदाजाने क्लासेनला 47 धावांवर बाद केले अने जोडी फोडली.

क्लासेनची साथ सुटल्यानंतर मिलरने एकट्याने किल्ला लढवला. त्याने जेराल्ड कॉट्झीला सोबत घेत संघाला दीडशतकी मजल मारून दिली. दरम्यान, त्याने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. मात्र जेराल्ड 19 धावा करून बाद झाला.

दुसऱ्या बाजूने मिलरने आपला झंजावात कामय राखत 115 चेंडूत शतक ठोकले. शतकाबरोबरच त्याने अफ्रिकेला 200 धावांच्या पार देखील पोहचवले. मात्र पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. अखेर अफ्रिकेचा डाव 212 धावात संपुष्टात आला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये