क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

अर्शदीप अन् आवेशच्या भेदक माऱ्यापुढे आफ्रिकेची शरणागती; 78 धावांवर 8 बाद, विकेट्सचा चौकार

जोहानबर्ग : (South Africa Vs India 1st ODI) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील टी-20 मालिका संपल्यानंतर भारतीय संघ वनडे मालिकेसाठी सज्ज झाला आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

India vs SA 1

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या आफ्रिकन संघाला भारतील गोलंदाजांनी पळता भुई थोडा करुन सोडले. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने भारताला चांगली सुरुवात करून सलामीवीर रीझा हेंड्रिक्सला क्लीन बोल्ड केले. हेंड्रिक्सला खातेही उघडता आले नाही. 3 च्या धावसंख्येवर दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्याच षटकात दोन मोठे धक्के बसले. अर्शदीपने सलग दोन चेंडूंवर हेंड्रिक्स-डुसेनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

India vs SA 5

आठव्या षटकात 42 धावांवर अर्शदीपने दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का बसला. त्याने टोनी डी जॉर्जीला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. त्यानंतर 10व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हेनरिक क्लासेनला बोल्डच्या रुपाने अर्शदीप सिंगने चौथा विकेट्स घेत आफ्रिकेचे कंबरडे मोडून काढले. अर्शदीप सिंगने घातक गोलंदाजी करताना चार विकेट घेतल्या.

India vs SA 4

अर्शदीपने चार विकेट्स घेतल्यांतर आवेश खानने आपला करिष्मा दाखवायाल सुरुवात केली. त्याने 11व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर एडन मार्कराम आणि व्हियान मुल्डरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 11 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यात 54 धावा होती. दक्षिण आफ्रिकेला 17व्या षटकात 73 दोन मोठे धक्के बसले डेव्हिड मिलरनंतर केशव महाराजला आऊट करत सामन्यात चौथी विकेट घेतली. सध्या 73 धावांवर 8 बाद अशी स्थिती आहे. सध्या नांद्रे बर्जर आणि अँडिले फेहलुकवायो क्रीजवर आहेत.

India vs SA 3

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये