प्रभास अडकणार लग्नबंधनात; ‘या’ ठिकाणी पार पडणार विवाहसोहळा
Prabhas Wedding | दाक्षिणात्या सिनेसृष्टीतील सुपरस्टार प्रभास (Prabhas) सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. कारण लवकरच प्रभास लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे प्रभासच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्याचे चाहते गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नाची प्रतिक्षा करत आहेत. पण आता लवकरच प्रभास लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आता प्रभास नेमंक कोणाशी लग्न करणार आहे याबात जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक झाले आहेत. कारण काही दिवसांपूर्वी प्रभासचं नाव अभिनेत्री क्रिती सेननसोबत जोडलं जात होतं. क्रिती सेनन आणि प्रभास यांच्या डेटींगच्या चर्चा देखील सुरू होत्या. त्यानंतर काही दिवसांपूर्वी प्रभास आणि अनुष्का शेट्टीच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभासची काकी म्हणाली की, दुर्गा देवीच्या आशीर्वादानं प्रभासचं लग्न होईल. प्रभास लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नाचं आमंत्रण माध्यमातील सर्वांना दिलं जाणार आहे. तसंच प्रभासनं वेडिंग लोकेशनदेखील ठरवलं आहे.
तर प्रभासची होणारी पत्नी नक्की कोण असणार यासंदर्भात त्याच्या काकीने काहीही माहिती दिलेली नाहीये. तसंच प्रभासनं एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं होतं की, मी तिरूपतीमध्ये लग्न करणार आहे. तर आता प्रभास लग्नबंधनात अडकणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
https://www.instagram.com/p/Cxw2Mo_PFI3/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
.