“आमची मैत्री फक्त काॅन्टेन्टसाठी…”, राखीसोबतच्या मैत्रीवर किरण माने स्पष्टच बोलले
!["आमची मैत्री फक्त काॅन्टेन्टसाठी...", राखीसोबतच्या मैत्रीवर किरण माने स्पष्टच बोलले rakhi sawant kiran mane](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/03/rakhi-sawant-kiran-mane-780x470.jpg)
मुंबई | Kiran Mane – यंदाचं ‘बिग बॉस मराठी’चं (Bigg Boss Marathi 4) चौथं पर्व चांगलेच गाजलं आहे. बिग बाॅसच्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर (Akshay Kelkar) ठरला. मात्र, या घरातील प्रत्येक सदस्यानं आपल्या उत्कृष्ट खेळीनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. तसंच नुकतंच बिग बॉसमधील या सर्व कलाकारांचं रियुनियन पाहायला मिळालं. त्यानिमित्तानं अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
बिग बॉसच्या घरात राखी सावंत (Rakhi Sawant) आणि किरण माने यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. तसंच नुकतंच या दोघांनी कलर्स मराठी वाहिनीवरील पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यापार्श्वभूमीवर किरण मानेंनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.
किरण माने यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “कलर्स मराठी ॲवाॅर्डस् सोहळ्यात राखी भेटली. ‘बिगबाॅस’मध्ये झालेली माझी एक निखळ मैत्री ! शो मध्ये आम्ही फूल्ल धम्माल केली. पण आमची जोडी, आमचं मजेशीर फ्लर्टिंग, हे सगळं बाहेर प्रचंड पाॅप्यूलर झालंय, हे आमच्या गांवीही नव्हतं. बाहेर आल्यावर शेवटचे दहा बारा एपिसोड पाहून चकितच झालो… आमची मैत्री खरीखुरी होती, फक्त काॅन्टेन्टसाठी नव्हती.”
“याचा भक्कम पुरावा म्हणजे, 9 लाख रूपये असलेली बॅग तिच्याऐवजी मी घ्यावी यासाठी तिनं कळकळीनं, परोपरीनं प्रयत्न केले. मला ते पैसे मिळावेत अशी तिची लै लै लै इच्छा होती. बॅग घेऊन बाहेर आल्यावरही ती तेजस्विनीला म्हणाली की हे पैसे किरणला मिळायला हवे होते. अर्थात मी ती बॅग घेणार नव्हतो कारण मला सपोर्ट करणार्या, माझ्यासाठी व्होटिंग करणार्या माझ्या चाहत्यांचा मला अपमान करायचा नव्हता. पण राखीने माझ्यासाठी स्वत:च्या 9 लाख रूपयांचा त्याग करायची तयारी दाखवली होती, हे माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. सोपं नसतं हे गड्याहो ! मला बिगबाॅसनं खूप काही दिलं, त्याचबरोबर ही मोठ्या मनाची नितळ मैत्रीणही दिली…लब्यू राखी !”, अशी पोस्ट किरण माने यांनी शेअर केली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.