परिवर्तन युवा परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद
चौथा परिवर्तन राज्यस्तरीय युवा परिषदेला राज्यभरातील तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एस एम जोशी सभागृहात दोन दिवस चाललेली ही परिषद तब्बल १००० हून अधिक युवक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली.
उद्घाटन समारंभामध्ये ज्ञान की लायब्ररीचे प्रमुख आणि विचारवंत प्रदीप लोखंडे यांनी पुनीत बालन उद्योग समूहाचे अध्यक्ष पुनीत बालन यांची चरित्रात्मक मुलाखत घेतली.
यावेळी पारदर्शकता स्वाभिमान आणि प्रयत्नातील सातत्य या त्रिसूत्रीवर तरुणाने उद्योजकतेमध्ये प्रगती करावी असे आवाहन श्रीपादन यांनी केली त्यांचा संपूर्ण जीवन चरित्र मांडत अनेक प्रेरणादायी विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
दुसऱ्या सत्रामध्ये राजकारण आणि युवक या विषयावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांची प्रकट मुलाखत राष्ट्र संचारचे संपादक अनिरुद्ध बडवे आणि अक्षय उंद्रे यांनी घेतली. महिलांवरील अत्याचार त्यावरील उपाय योजना महिलांचे राजकारणामधील स्थान त्यावर समोरील आव्हाने याबाबत रूपालीताई यांनी मोलाचे विचार व्यक्त केले.
तिसरा सत्रामध्ये सामाजिक कार्यात युवकांचे भूमिका या विषयावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चेवटे रेस्क्यू फाउंडेशनच्या नेहा पंचमीया आणि नचिकेत उत्पाद तर सुप्रसिद्ध डॉक्टर आणि पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे फाउंडेशनचे प्रमुख संदीप डोळे यांनी आपली भूमिका व्यक्त केली.
अनिरुद्ध बडवे आणि स्वातीताई मते यांनी या मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या.
चौथ्या सत्रामध्ये युवक आणि नागरिकशास्त्र या विषयावर माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडळाचे प्रमुख अविनाश धर्माधिकारी यांनी अत्यंत प्रबोधनात्मक विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या समारोप वेळी खासदार निलेश लंके यांनी उपस्थित तरुणांना आपल्या राजकीय कार्यकर्ते ची माहिती देत चारित्र्यशील राजकारण करण्याचा सल्ला दिला.परिवर्तन ग्रुपचे श्री किशोर ढगे, अभिजीत घुले , सचिन जगताप सर , जीवन जाधव , उमेश चौधरी , विठ्ठल ताम्हण , दिपाली देडगे , सचिन जगताप आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
………………………….
वन्यजीवांचे थरारक अनुभव
तिसऱ्या सत्रामध्ये रेस्क्यू फाउंडेशनचे नेहा पंचम या आणि नचिकेत उत्पाद यनी वन्यजीवांसोबत सहजीवन मान्य करण्याबाबतचे विचार मांडले. वन्य पणी आपल्यामध्ये येत नसून नागरी समूहाने वन्यप्राण्यांच्या कार्यक्षेत्रात अतिक्रमण केले आहे म्हणून या समस्या वाढत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. यावेळी वन्य जीवांना पुन्हा जंगलात सोडण्यासाठी आलेले अनेक अनुभव त्यांनी कथन केले वन्यजीवन सोबतचे थरारक अनुभव ऐकताना श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे राहत होते.
गेल्या दोन वर्षात सुमारे ३०० कोटीहून अधिक निधी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या वतीने वितरित करण्यात येत असून २४ तास कार्यरत राहणारा हा एकमेव शासकीय विभाग असल्याचे श्री मंगेश चिवटे यांनी सांगितले .यावेळी श्रोत्यांमधून उत्स्फूर्तपणे या कक्षाच्या अनुभवाबाबत अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. मंगेश चिवटे यांच्या सकारात्मक नेतृत्वाचे आणि दिवसांची चर्चा कार्यक्रम स्थळी मोठ्या प्रमाणात होत होती .