महाराष्ट्रमुंबईसिटी अपडेट्स

एसटीचे गाडे पुन्हा रुळावर

मुंबई ः एसटी संप आणि कोरोनाच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच महामंडळाचे उत्पन्न मंगळवारी २५ कोटी ४७ लाखांवर पोहोचले आहे. तसेच, एसटी महामंडळाच्या दैनंदिन सरासरी उत्पन्नात जवळपास १२ कोटींची वाढ झाली आहे. दहा वर्षांत एसटी महामंडळाचा आर्थिक विक्रम वाढत असून, एसटीची आर्थिक स्थिती पुन्हा रुळावर येण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रवासी एसटीकडे परतले…
सर्वाधिक उत्पन्न एसटीच्या १३ हजार गाड्यांच्या ताफ्यातून दिसून येत आहे. एसटी संपानंतर पुन्हा एकदा प्रवासी एसटीकडे परतत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. संपाच्या काळात प्रवासीवर्ग एसटीपासून दुरावला होता. ३० ऑक्टोबर रोजी दररोज २३ कोटींपर्यंत उत्पन्न जमा झाले होते.

दिवाळीमध्ये केलेल्या १० टक्के भाडेवाढीमुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न ८ कोटींनी वाढले असल्याची माहिती मिळत होती. एसटी महामंडळाचे सरासरी दर दिवसाला उत्पन्न १५ कोटींच्या जवळपास आहे. प्रवासी वर्ग पुन्हा एसटीकडे परतत असल्याने उत्पन्न २० कोटींपर्यंत राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. या काळामध्ये एसटी महामंडळाने प्रति किलोमीटर अधिकाधिक उत्पन्न आणण्यासाठी प्रत्येक विभागाला दैनंदिन उद्दिष्ट दिले होते, तर दिवाळीमध्ये सर्वाधिक उत्पन्न ३१ आॅक्टोबर रोजी २५ कोटी ४८ लाख इतके आले आहे. तसेच, दिवाळीपूर्वी एसटीचे दैनंदिन उत्पन्न सरासरी १३ कोटींच्या आसपास होते. ते दिवाळीमध्ये तब्बल २० कोटींपर्यंत गेले आहे. दरम्यान, मध्यंतरी एसटी कामगारांच्या संपामध्ये महामंडळाचे पूर्णपणे हाल झाले होते. त्यामुळे महामंडळाला निधी केव्हा मिळणार याच्याच प्रतीक्षेत एसटी महामंडळ होते. मात्र, नुकताच सरकारने महामंडळाला निधी उपलब्ध झाल्याने काहीसा दिलासा महामंडळाला मिळाला आहे.

अधिक उत्पन्न आणणारे विभाग
प्रथम क्रमांक – धुळे विभाग
द्वितीय क्रमांक – जळगाव विभाग
तृतीय क्रमांक – कोल्हापूर विभाग

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये