ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

राज्यात मध्यवर्ती निवडणूका लागणार? राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण

मुंबई : (State Chief Electoral Officer Shrikant Deshpande) महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती पाहात अनेक जेष्ठ नेत्यांनी राज्यात मध्यवर्ती निवडणूका लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अशा अनेक नेत्यांनी ही शक्यता वर्तवली होती. त्यातच आता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या एका वक्तव्यानं चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे.

दरम्यान, निवडणूक अधिकारी देशपांडे यांच्याकडून निवडणूकीच्या अनुषंगाने भंडाऱ्या जिल्हाचा आढावा घेण्यात आला होता. श्रीकांत देशपांडे यांच्याकडून राज्यभर दौरा करण्यात येत आहे. जिल्ह्याचा आढावा घेण्यात आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, दोन्ही निवडणुका एकत्र घेण्यास प्रशासन सज्ज आहे. त्यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना देशपांडे म्हणाले, कोणत्याही निवडणूकीची तयारी महिन्याभरात पुर्ण होत नाही. तर त्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या निवडणूकांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आणि निवडणूक यंत्रणेची माहिती घेण्यासाठी दौरा सुरू आहे.

पुढे बोलताना देशपांडे म्हणाले, 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणूका होणार आहेत. या दोन्ही निवडणूका एकत्र घेण्यासाठी निवडणूक आयोग आणि प्रशासन सज्ज आहे. त्यामुळे आता देशातील राजकीय पक्ष निवडणूकांच्या तयारीला लागण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये