ताज्या बातम्यामहाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला
पंतप्रधान मोदींनी ८ महिन्यांपूर्वी केलं होतं अनावरण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा कोसळला आहे. यामागचं कारण अजून अस्पष्ट आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं.
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५ फुटांचा पुतळा हा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवणमधील तारकर्लीच्या समुद्रकिनारी नौदल दिनाच्या कार्यक्रमाच्या वेळी या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते. हाच पुतळा आता कोसळला आहे.