बालगंधर्व परिवाराचे शिलेदार

जीवनगौरव पुरस्कार–
बालगंधर्व परिवाराचा पहिला जीवनगौरव पुरस्कार हा विक्रम गोखले यांना देण्यात आला होता. त्यानंतर इनॉक डॅनियल, राघवेंद्र कडकोळ, रोहिणी हट्टंगडी, मधू गायकवाड, कीर्ती शिलेदार, हिराबाई लाखे, गुलाबबाई संगमनेरकर, स्वरुपकुमार, मनोहर कुलकर्णी , यमुनाबाई वाईकर, समीर रुक्मिणीबाई खुटेगावकर आदी कलाकारांना मिळाला आहे.
कोणतेही शिवधनुष्य पेलणे हे कोणा एकट्या-दुकट्याचे काम कधीच नसते. असे शिवधनुष्य पेलण्यासाठी सक्षम नेतृत्व तर लागतेच, पण सोबतच त्याला अनेक हातांचा आधार लागतो, सहकार्य लागते आणि जेव्हा तुम्ही कलाकार असता तेव्हा तर एकत्र येऊन एखादे कार्य तडीस नेणे अत्यंत कठीण काम असते. अशावेळी एखादी परंपरा, एखादा वारसा पुढे नेणारे हात म्हणजे देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे ही उक्ती अत्यंत चपखल बसते. बालगंधर्व रंगमंदिर परिवाराबाबत ही उक्ती अगदीच चपखल बसते. कारण गेली पंधरा वर्षे हा महोत्सवास अविरतपणे पुणेकरांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे . याला अपवाद केवळ कोविडची ती भयंकर दोन वर्षे. पण काळ्याकुट्ट ढगांनाही सोनेरी किनार असते, त्याप्रमाणे तो काळ संपला नि नव्या वर्षातील हा नवा महोत्सव पुणेकरांच्या भेटीला येतो आहे.
मात्र या महोत्सवासाठी अनेक हात रात्रंदिवस राबत आहेत. या बालगंधर्व परिवाराचे शिलेदार ज्यांनी हा सोहळा अविरत सुरू ठेवला आहे. रवींद्र काळे, धनंजय गायकवाड आणि महेश शिंदे हे तिघेही आज या जगात नाहीत. मात्र या आणि अशा अनेक सदस्यांच्या कल्पनेतून हा परिवार सुरू झाला. गेली १५ वर्षे अविरत या परिवाराचे अध्यक्ष म्हणून मेघराज राजेभोसले यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या सोबतीला उपाध्यक्ष योगेश देशमुख व विनोद धोकटे, सचिव अनिल गोंदकर, खजिनदार अण्णा गुंजाळ, सहसचिव पराग चौधरी व चित्रसेन भवार, सहखजिनदार कैलास माझिरे व वनमाला बागुल ही टीम उत्साहाने सोबत होती. सोबतीला नितीन मोरे, शशिकांत कोठावळे, संजय मगर, गणेश गायकवाड, अरुण गायकवाड, बाळासाहेब निकाळजे, मिठू पवार, उमेश मोडक, प्रताप रोकडे, गणेश मोरे, शंकर घोडेराव, कुमार गायकवाड, रोहित सोनावणे, हेमंत महाडिक, बबन वाघमारे, देविदास साठे, योगेश सुपेकर, वर्षा संगमनेरकर, शोभा कुलकर्णी, स्वाती धोकटे, शिल्पा भवार.
उषा करंबेळकर, रेणू पुणेकर हे कार्यकारिणीतील अन्य सदस्यही होते. या प्रत्येक शिलेदाराचे सहकार्य, सहभाग आणि मदतीशिवाय हा परिवार पुढे जाऊ शकत नाही. यासोबतच अनेक दृश्य आणि अदृश्य हातांचे बळदेखील या शिलेदारांच्या सोबतीला होते, आहे आणि राहील, यात शंका नाही. एखादे नेतृत्व जर सक्षम असेल तर काय होऊ शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून या बालगंधर्व परिवाराकडे बघता येऊ शकते. अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाने कायमच सगळ्या संस्थांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. मग ती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ असो की अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पुणे असो की महाकलामंडळ ही सर्व समावेशक संस्था असो… सगळीकडे त्यांनी स्वतःच्या नेतृत्वकौशल्याने आपला ठसा उमटविला आहे.