ताज्या बातम्या

भूकंपामुळे रात्री नेपाळ हादरलं; आतापर्यंत 72 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Earthquake Nepal : नेपाळ गेल्या काही महिन्यांत बऱ्याचदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरुन निघाल्याचे पाहायला मिळाले. नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा तीव्र भूकंपाचे धक्के बसून हाहाकार माजवला. 6.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाने नेपाळमध्ये मृत्यूतांडव पाहायला मिळाले. भूकंपात आतापर्यंत 72 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे अनेकजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुकुम पश्चिम आणि जाजरकोटमध्ये भूकंपामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

नेपाळमधील भूकंपाची तीव्रता दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात दिसली यावरून अंदाज लावता येतो. बिहारमधील पाटणा आणि मध्य प्रदेशातील भोपाळपर्यंत भूकंपाचे हलके धक्के जाणवले आहेत. नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप मापन केंद्रानुसार, नेपाळच्या जाजरकोट जिल्ह्यातील लामिडांडा भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांनी भूकंपामुळे झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी बचाव आणि मदतीसाठी 3 सुरक्षा एजन्सी तैनात केल्या आहेत. या भूकंपाचा प्रभाव उत्तर प्रदेशातील लखनौमध्येही दिसून आला, भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरुन घराबाहेर पडल्याचे पाहायला मिळाले.

दिल्ली, एनसीआर, हरियाणातही धक्के

दिल्ली-एनसीआर, यूपी, बिहार, उत्तराखंड आणि हरियाणासह देशातील अनेक भागांत भूकंपाचे जोरदार धक्के बसले. भूकंपाचे धक्के इतके जबरदस्त होते की, लोकांमध्ये भीती पसरली होती. अचानक आलेल्या या भूकंपामुळे लोक घराबाहेर पडले. हायराईज सोसायटीच्या विधानसभा परिसरातही लोक जमले होते. रात्री 11.32 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के बराच वेळ जाणवत होते. लोक जेवल्यानंतर झोपण्याच्या तयारीत असताना हे धक्के बसले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये