ताज्या बातम्यादेश - विदेश
मोठी बातमी! दिल्लीमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के
नवी दिल्ली | Earthquake : दिल्लीमधून (Delhi) एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीमध्ये आणि राजधानी परिसरात जोरदार भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले आहेत. सोमवारी सव्वाचारच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.
दोन दिवसांपूर्वी नेपाळमध्ये मोठा भूकंप झाला होता. त्यानंतर आता दिल्लीत देखील भूंकपाचे धक्के जाणवले आहेत. याबाबतचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. दिल्लीमध्ये जाणवलेले भूकंपाचे धक्के जोरदार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, आज झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू हा नेपाळमध्ये असल्याचं भूकंपशास्त्र विभागानं म्हटलं आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.6 इतकी नोंदवली गेली आहे.