ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्ररणधुमाळी

“कृषी क्षेत्रात विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदी आणि नितीन गडकरींचा आदर्श घ्यावा”

अकोला : कृषी क्षेत्रात अनेक प्रयोग करावे लागतात आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आदर्श घेण्याचं आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल भागातसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. ते आज (गुरुवार) अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाच्या ३६ व्या दीक्षांत समारंभात अध्यक्षपदावरून बोलत होते.

व्यासपीठावरून विद्यार्थ्यांना संबोधित करताना राज्यपाल म्हणाले, विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम एक आदर्श नागरिक बनणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय अगोदर निश्चित करावं. कृषी क्षेत्रात अनेक प्रयोग करावे लागतात त्यासाठी विद्यार्थ्यांनी नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. ते सतत अनेक प्रयोग करत असतात. नितीन गडकरी राजभवनात ग्रीन हायड्रोजन तयार करणार आहेत. मी देखील राजभवनाच्या परिसरात विविध प्रयोग करत असतो असंही देखील राज्यपालांनी सांगितलं.

राज्यपाल पुढे म्हणाले, राज्यात दुष्काळाच्या समस्या भेडसावतात. त्यावर जालायुक्त शिवार सारख्या योजना उपायकारक ठरल्या आहेत. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी चांगल्या प्रबळ इच्छा शक्तीची गरज आहे. आगामी काळात नक्कीच या क्षेतात समृद्धी येईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये