ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

मराठी सिनेसृष्ठी पुन्हा बहरली! शुक्रवारी ‘सुभेदार’ अन् नागराजचा ‘बापल्योक’ प्रेक्षकांच्या भेटीला..

Subhedar Baaplyok Marathi Movie Release On Friday : कोरोनानंतर थंडावलेली मराठी मनोरंजनसृष्टी (Marathi Movies) आता पुन्हा एकदा बहरली आहे. कोरोनानंतर रितेश देशमुखच्या ‘वेड’ (Ved) या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला. त्यानंतर 30 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये आजही कायम आहे. आता ‘सुभेदार’ (Subhedar) आणि ‘बापल्योक’ (Baaplyok) हे सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज आहेत.

राज्यातील शेकडो सिनेमागृहांत प्रदर्शित होणार सुभेदार (Subhedar Movie Details) ‘सुभेदार’ या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली आहे. ‘सुभेदार’ या ऐतिहासिक सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या सिनेमात तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम पाहायला मिळणार आहे.

‘सुभेदार’ या सिनेमाच्या टीझर, ट्रेलर आणि गाण्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यातील शेकडो सिनेमागृहांसह, देशातील महत्त्वाच्या शहरांतून सहा विविध देशांमध्ये ‘सुभेदार’ हा सिनेमा 25 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमा सोबतच त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचे पदर कुटुंबाने दिलेली तितकीच मोलाची साथ याचे दर्शन ‘सुभेदार’ सिनेमात होणार आहे.

नागराज मंजुळेच्या ‘बापल्योक’ची प्रेक्षकांना उत्सुकता (Baaplyok Movie Details)
‘बापल्योक’ हा सिनेमा 25 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. नागराज मंजुळे (Nagraj Manjule) या सिनेमाचा प्रस्तुतकर्ता आहे. वडिल आणि मुलगा यांच्यातील नात्याचा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उलगडत जाणारा अर्थ, नव्याने सांधले जाणारे बंध, याचा सुरेख मेळ ‘बापल्योक’ या सिनेमाच्या माध्यमातून साधला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये