अर्थताज्या बातम्यादेश - विदेश

भाजपच्या जेष्ठ नेत्याकडून अदानींची तुलना फ्रान्सच्या राजाशी; म्हणे “मी जगलो तरच…”

नवी दिल्ली : (Subramhanyam Swamy On Gautam Adani) उद्योगपती गौतम अदाणी (Gautam Adani) यांच्या उद्योगसमुहाबद्दल हिंडेनबर्ग कडून गंभीर आरोप केल्यानंतर अदानी उद्योग समुहाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. यावर भाजपचे नेते माजी खासदार सुब्रम्हण्यम स्वामी (Subramaniam Swamy) अदानी यांना टोला लगावला आहे. सुब्रम्हण्यम स्वामी यांनी फांसचा राजा किंग लुईस याचा संदर्भ देत अदानींना टोला लगावला आहे. भारतावर सुनियोजित हल्ला!! फ्रांसचा राजा किंग लुईस म्हणाला होता “Apre moi Le deluge” अदानी यांनीही तेच म्हटले आहे; “मी जिवंत असेल तरच भारत देखील”

हिंडेनबर्गचा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी उद्योगसमूहाला तब्बल ४.२ लाख कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. यानंतर अदानी समूहाकडून ४१३ पानांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तसेच यामध्ये त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप देखील फेटाळून लावले आहेत.

अदानी उद्योगसमूहाने हा रिपोर्ट म्हणजे भारताविरूद्धचा सुनियोजित कट असल्याचे म्हटले आहे. हिंडेनबर्गचा हा रिपोर्टचा मूळ उद्देश हा केवळ अमेरिकन कंपनीला फायदा मिळवून देणे हा होता. हा रिपोर्ट म्हणजे केवळ एका विशिष्ट कंपनीवर केलेला अवास्तव हल्लाच नाही तर, भारताचे स्वातंत्र्य, अखंडता, गुणवत्ता, विकास आणि महत्त्वाकांक्षेसह भारतीय संस्थांवर पद्धतशीर हल्ला असल्याचे अदानींनी म्हटले आहे.

अमेरिकन शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या नकारात्मक अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.दरम्यान हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी समूहात अनेक अडचणी असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा समूह अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंट फ्रॉडमध्ये गुंतलेला आहे असे सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये