देश - विदेश
मोहिम यशस्वी! भारताचा चंद्रावर तिरंगा; ‘चांद्रयान-3’चं यशस्वी साॅफ्ट लँडिंग
भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाली आहे. चांद्रयानातील विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग केली आहे. यामुळे चंद्रावर लँडिंग करणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. तर, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.
चांद्रयान-3 मधील लँडर मॉड्यूल हे यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आहे. त्यामुळे हा क्षण भारतासाठी ऐतिहासिक आहे. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.