आम आदमी पार्टीच्या शहराध्यक्षपदी जगदाळे
पुणे | Pune News – आम आदमी पार्टीच्या (AAP) पुणे (Pune) शहराध्यक्षपदी सुदर्शन जगदाळे (Sudarshan Jagdale) यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्राचे प्रभारी गोपाल इटालिया यांनी सुदर्शन जगदाळे यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे जाहीर केले.
आम आदमी पक्षाच्या स्थापनेपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विचारानुसार ते पक्षाचे काम करत आहेत. सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ते खाजगी कंपनीमध्ये कार्यरत होते. त्यांचे शिक्षण बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स झाले आहे. पुणे शहरामध्ये आम आदमी पक्षाच्या वतीने घेण्यात आलेली आंदोलने तसेच पाणी प्रश्न याबाबत त्यांनी विशेष पुढाकार घेऊन मांडणी केली होती.
पुणे शहरातील आम आदमी पार्टी युवक तसेच महिला यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करून पक्ष बांधणी केली. पुणे शहराच्या आम आदमी पार्टीच्या मीडिया सेलचे प्रमुख म्हणून देखील ते काम पाहत होते.
आगामी पुणे महानगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने उच्चशिक्षित युवा नेतृत्वाच्या हातात अध्यक्षपदाची सूत्रे सोपवली असून युवकांना आकर्षित करण्याचा पक्षाचा उद्देश आहे, असे जगदाळे यांच्या निवडीतून स्पष्ट होते.