”नशेच्या पदार्थांचे लायसन्स असलेल्या नेत्यांना ठेचून काढलं पाहिजे”; सुधीर मुनगंटीवार
मुंबई : (Sudhir Mungatiwar On Congress Leaders) ड्रग्ज व्यवसायात कोणत्याही नेत्याचा संबंध असता कामा नये, अशा नेत्यांना ठेचून काढलं पाहिजे असं विधान मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. त्यांनी ड्रग्ज प्रकरणावर बोलताना काँग्रेस नेत्यांवर आरोप केले.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, जी लोकं ड्रग्जशी संबंधित असतात त्यांना सोडलं नाही पाहिजे, ठेचून काढलं पाहिजे. यात दुमत असण्याचं काहीही कारण नाही. काँग्रेसचे असे अनेक नेते आहेत ज्यांच्याकडे नशेच्या पदार्थांचं लायस्नस आहेत. त्यांची यादीच माझ्याकडे आहेत.
मुनगंटीवार पुढे म्हणाले की, मुळात राजकीय नेते, आमदार, खासदार आणि त्यांच्या नातेवाईकांकडे नशेच्या पदार्थांचं लायसन्स नसलं पाहिजे. तसा नियमच पाहिजे. दारुविक्रीचे परवाने असलेले काँग्रेसचे अनेक नेते आहेत. त्यांची यादीदेखील आहे, असं मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, ललित पाटील ड्रग्ज प्रकरणानंतर राजकीय पटलावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी एकमेकांना टार्गेट केलं आहे. त्यातच मुनगंटीवार यांनी थेट काँग्रेसवर आरोप केले आहेत. काँग्रेसच नेत्यांची यादी आहे, असं म्हणणाऱ्या मुनगंटीवारांना काँग्रेस नेत्यांकडून काय उत्तर मिळतं, ते बघावं लागेल.