ताज्या बातम्यापुणेसिटी अपडेट्स

सार्वजनिक वाहतुकीचे अभ्यासक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सुजित पटवर्धन यांचं निधन

पुणे | Sujit Patwardhan – सार्वजनिक वाहतुकीचे अभ्यासक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सुजित पटवर्धन (Sujit Patwardhan) यांचं निधन झालं आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. तसंच दोन दिवसांपूर्वी त्यांना खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र आज (22 ऑक्टोबर) पहाटे त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.

सुजित पटवर्धन हे गेल्या वीस वर्षाहून अधिक काळ पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील सार्वजनिक वाहतूक सक्षम व्हावी यासाठी प्रयत्नशील होते. बीआरटी, पदपथ, सायकल ट्रॅक, हवेची गुणवत्ता, नदी सुधार हे त्यांच्या आभ्यासाचे विषय होते. तसंच सुजित पटवर्धन यांनी शहरातील पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी 1980 मध्ये परिसर या संस्थेची स्थापना केली होती.

सुजित पटवर्धन हे व्यवसायानं प्रिंटर होते. प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा अभ्यास त्यांनी इंग्लंडमध्ये केला होता. तेथून परतल्यावर पुण्यात नारायण पेठेत ‘मुद्रा’ ही प्रिंटिंग प्रेस त्यांनी स्थापन केली होती. त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यांनी वापरले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये