जॅकलीनच्या फोटोवर मिका सिंहची कमेंट; सुकेशनं पाठवली तुरुंगातून नोटीस! नेमकं प्रकरण काय?
मुंबई | अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) तिच्या कथित बॉयफ्रेंड आरोपी सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याच्यामुळे चर्चेत असते. यावेळी मात्र अभिनेत्रीच्या इन्स्टाग्राम फोटोवर कमेंट केल्याबद्दल मनी लॉंड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरने गायक मिका सिंहला (Mika Singh) कायदेशीर नोटीस पाठवली आहे. अलीकडेच जॅकलीन फर्नांडिसने हॉलिवूड अभिनेता जीन-क्लॉड व्हॅन डॅमेसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोवर मिका सिंहने विचित्र कमेंट केली होती. ज्याबाबत सुकेशने आता मिका सिंहला इशारा दिला आहे.
मिकाने केलेली कमेंट काय होती?
मिकाने जॅकलिन फर्नांडिस आणि हॉलिवूड अभिनेता जीन-क्लाउड यांच्या फोटोवर लिहिले होते, ‘तू खूप सुंदर दिसत आहेस…, तो #सुकेशपेक्षा खूप चांगला आहे…’ या वादग्रस्त कमेंटनंतर काही वेळातच मिका सिंहने आपली कमेंट डिलीट केली. मात्र, तोपर्यंत मिका सिंहची ही पोस्ट व्हायरल झाली होती.
सुकेश चंद्रशेखरने दिला मिका सिंहला इशारा
आता मिका सिंहला तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने इशारा दिला असून कायदेशीर नोटीसही पाठवली आहे. सुकेशचे वकील अनंत मलिक यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे की, ‘या वक्तव्याद्वारे तुम्ही माझ्या अशिलाच्या चारित्र्यावर आणि व्यक्तिमत्त्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तुमच्या कमेंटमुळे त्यांना मीडियाच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले. ही परिस्थिती त्यांच्या विद्यमान संकटात वाढ करत आहे आणि त्यांना सतत मीडिया ट्रायलसारख्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.