“आय लव्ह यू, मी कायम तुला…”; सुम्बुल तौकीरची भावनिक पोस्ट

मुंबई | Sumbul Touqeer – अभिनेत्री सुम्बुल तौकीर (Sumbul Touqeer) सध्या चांगलीत प्रसिद्धीझोतात आली आहे. ‘इमली’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली होती. तसंच ‘बिग बाॅस’ या शोमध्ये सहभागी होत तिनं लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सुम्बुलचा चाहता वर्गही मोठा आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आताही सुम्बुलनं एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
सुम्बुलच्या घरातील एका पाळीव मांजरीचं निधन झालं आहे. या संदर्भात सुम्बुलनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिनं चाहत्यांना ही बातमी दिली आहे. या पोस्टमध्ये सुम्बुलनं तिच्या हातातील ब्रेसलेटचा फोटो शेअर केला आहे. या फोटोतील तिच्या ब्रेसलेटवर मांजर असल्याचं दिसत आहे.
हा ब्रेसलेटचा फोटो शेअर करत सुम्बुलनं लिहिलं आहे की, “आय लव्ह यू.. मी कायम तुला माझ्या हृदयात ठेवेन, तुला शांती मिळो. बच्चा..तू आमच्याबरोबर फक्त एक महिना राहिलीस पण आम्हाला खूप छान आठवणी देऊन गेलीस. तू नेहमी आठवणीत राहशील.” सुम्बुलची ही पोस्ट सध्या चांगलची चर्चेत आहे. तसंच तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.