आरोग्यताज्या बातम्या

उन्हाळ्यात राहा ठंडा-ठंडा कूल-कूल; अशी घ्या शरीराची काळजी

Summer Health Tips : निसर्गनियमानुसार वातावरणात बदल होणं स्वाभाविक असतं, निसर्गाच्या नियमानुसार बदल होतच असतात ते आपल्या हातात नसतं. मात्र या बदलांना जुळवून घेणं आपल्या हातात असतं. उन्हाळ्याच्या काळात उष्णता वाढल्याने आरोग्यविषयक अनेक समस्या उद्भवत असतात. अशा परिस्थितीत शरीराला त्रास होऊ नये व आजारी पडू नये यासाठी शरीर थंड ठेवणे महत्वाचे ठरते. त्यासाठी रोजच्या आहारात काही पदार्थांचे सेवन करून शरीराला थंडावा मिळू शकतो.

image 2

दही (Curd) हा बहुतेक लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये अनेक पोषक घटक असतात. दररोज दही खाल्ल्याने केवळ ताजेतवाने वाटत नाही तर, पाचन तंत्रही ठीक राहते आणि पोटाचा त्रासही होत नाही. दही ऑस्टिओपोरोसिस, रक्तदाब, केस आणि हाडे यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटामिन बी 6 आणि व्हिटामिन बी12 या पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते. उन्हाळ्यात दिवसात बऱ्याचदा पोटाशी संबंधित अनेक समस्या असतात. दही आपल्या पाचन तंत्र (Digestion) मजबूत करण्यास मदत करते. एक चांगला बॅक्टेरिया आहे, जो पाचन तंत्रात अडथळा टाळतो आणि थंडपणा देतो. पोट खराब असल्यास, किंवा लूज मोशन असेल तर दही यावर चांगला उपाय ठरतो. दहीमध्ये एक लॅक्टिक अॅसिड असते. ज्यामुळे त्वचेचे संरक्षण होते. तसेच, उन्हाळ्याच्या हंगामात, त्वचेवर परिमाण होत असतो. चेहऱ्यासाठी दही उपयुक्त आहे.

image 2 1

कलिंगडमध्ये भरपूर पाणी असते, त्यामुळे ते शरीरात कधीही पाण्याची कमतरता भासू देत नाही. उन्हाळ्यात शरीराला पाण्याची खूप गरज असते कारण या ऋतूत घामाच्या रूपाने शरीरातून भरपूर पाणी वाया जाते. परंतु नेहमी साधे पाणी पिणे कधीकधी थोडे कठीण वाटते. अशा परिस्थितीत कलिंगड खाल्ल्याने शरीरातील पाण्याची गरज पूर्ण होऊ शकते. कलिंगडमध्ये 92% पाणी असते. एवढेच नाही तर ते शरीराला आतून थंड ठेवते, ज्यामुळे उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका कमी होतो.

kheera in winters eating cucumber at night 1

काकडी हे उन्हाळ्यात आवडीने खाल्ले जाणारे फळ आहे. अनेकजण पचनासाठी काकडी खातात. काकडीत पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर, मॅंगनीज यांसारखे काही महत्त्वाचे पोषक घटक असतात. हे घटक शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते. त्याचप्रमाणे, पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने, काकडी त्वचा निरोगी ठेवते.

image 2 2

उन्हाळ्यात फणस भरपूर प्रमाणात बाजारात येत असतात. फणसाचे गर खाण्यासोबतच त्याची भाजी आणि इतर पदार्थही बनवले जातात. वाढत्या उष्णतेमध्ये पिकलेला फणस खाणे आरोग्यासाठी तितकेच फायदेशीर असते. पिकलेला फणस खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. फणस खाल्ल्याने शरीर अनेक आजारांपासून दूर राहते. उन्हाळ्यात ज्यांना पचन नीट होत नाही, अशा लोकांनी पिकलेला फणस नक्की खा. फणस अल्सर आणि पचनाच्या समस्या कमी करतो. यामुळे वजन कमी करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास देखील मदत होते.

image 2 3

उन्हाळाच्या दिवसात सातू (सत्तू) खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सातू हे चवदार तर असतेच, परंतु त्याचे आरोग्याला फायदेही होतात. उन्हाळ्यात सातूचे सेवन केल्याने आपण उष्माघात आणि उष्णतेपासून बचाव होतो. यामुळे उष्णता कमी होते आणि शरीराला थंडावा मिळतो. उन्हाळ्यात सत्तूचे पेय प्यायल्याने शरीराच्या अनेक समस्या सहज दूर होतात. हे पेय चविष्ट तर असतेच पण त्यासोबतच शरीराला थंड ठेवण्यासही मदत करते. हे प्यायल्याने पचनक्रियाही मजबूत राहते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये