ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

‘बॉलीवूडचा खेळ संपलाय! इंडस्ट्रीमध्ये पहिल्यासारखी….’ अण्णा डायरेक्ट सगळं बोलून गेला?

Suniel Shetty Bollywood actors : बॉलीवूडचा अण्णा सुनील शेट्टी हा नेहमीच त्याच्या रोखठोक स्वभावासाठी प्रसिद्ध असणारा सेलिब्रेटी आहे. त्याच्या नावाची जोरदार चर्चाही होताना दिसते. काही दिवसांपूर्वी त्यानं बॉलीवूडमधील अराजकतेविषयी आणि भेदभावावर मत व्यक्त केले होते. आता पुन्हा एकदा त्यानं जी प्रतिक्रिया दिली आहे त्याविषयी धाडसानं मतप्रदर्शन केलं आहे.

अण्णा म्हणतो, बॉलीवूड आता हे काही पहिल्यासारखे राहिलेलं नाही. त्यात खूप सारा बदल झाला आहे. प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे. पण आपल्यासोबत बाकीचेही मोठे झाले पाहिजे अशी भावना नाही. अशावेळी आपल्याला काय करता येईल याचाही विचार मागे पडला आहे. अशी भावना सुनील शेट्टीनं व्यक्त केली होती. बॉलीवूडमधील एकता संपली आहे. अशा शब्दांत अण्णानं त्याचा राग व्यक्त केला आहे.

पहिल्यांदा सेटवर ज्याप्रकारे मोकळे वातावरण होते ते आता राहिलेले नाही. कोण कशाप्रकारे व्यक्त होईल हे सांगता येत नाही. माणसं एकमेकांशी बोलत नाही. त्याचा तोटा प्रत्येकाला होतो आहे. माहितीची देवाण घेवाण होत नाही. तुम्ही स्वताला प्रत्येकवेळी इतरांपेक्षा जास्त महत्वाचे समजू लागता. आणि त्याचा तुम्हालाच तोटा होतो हे ही लक्षात घेण्याची गरज आहे.

नील शेट्टीनं पुढे सांगितले होते की, आज तुम्ही इंडस्ट्रीविषयी बोलायला गेल्यास तर तुमचा आवाज दाबण्याचे काम केले जाते. आणि आता पहिल्या सारखी बॉलीवूडमध्ये एकताही राहिलेली नाही. सगळेजण आपआपले काम पाहतात. त्यांचा स्वार्थ त्यांना जास्त महत्वाचा वाटतो. अशावेळी कुणीही कुणाच्या मदतीला धावून येत नाही ही गोष्ट सांगायची आहे. कुणी कुणाला वाचविण्याचा प्रयत्नही करताना दिसत नाही. त्यामुळे सगळ्यांचा संवाद तुटला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये