‘आमच्यासाठी नारळाचं झाडं म्हणजे गोमाता’! बॉलीवूडचा अण्णा असं का म्हणाला..
मुंबई : (Sunil Shetty News) बॉलीवूडचा अण्णा म्हणून ज्याच्याकडे मोठ्या अभिमानानं पाहिले जाते त्या सुनील शेट्टीची गोष्टच वेगळी आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सुनील शेट्टीनं त्याच्या अभिनयानं आणि हटक्या स्टाईलनं प्रेक्षकांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे. आपल्या परखड वक्तव्याबद्दलही तो बऱ्याचदा ओळखला गेला आहे.
आता सुनील शेट्टी एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. एएनआयनं शेयर केलेल्या त्या व्हिडिओमध्ये अण्णानं मुलाखतीमध्ये नारळाचं झाड आणि गोमाता यांच्याविषयी वेगळी मांडणी केली आहे. जी चर्चेत आहे आणि नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यावर बाकीच्या नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत.
स्मिताज् पॉडकास्ट मध्ये सुनील शेट्टीला रॅपिड फायरमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते त्यातून त्यावेळई सुनील शेट्टीनं वेगवेगळ्या प्रश्नानं तितक्याच प्रभावीपणे उत्तरं दिली आहेत. आपल्या आवडत्या पदार्थांविषयी, ठिकाणांबाबत त्यानं सांगितलं आहे. अशात त्याला नारळाचं झाड याविषयी विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला, साऊथची लोकं नारळाच्या झाडाला गोमात असे म्हणतात.
नारळाच्या झाडाशी संबंधित प्रत्येक गोष्ट ही उपयोगात आणली जाते. त्याच्या फांद्या, नारळ, नारळाची करवंटी, नारळाचे पाणी, खोबरे, नारळाच्या शेंड्या यापासून विविध उपयोगी वस्तू तयार करता येतात. म्हणून साऊथमध्ये गायीप्रमाणेच नारळाच्या झाडाची पूजा केली जाते. असे अण्णानं त्या मुलाखतीमध्ये सांगितले.