ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

Gadar 2! आधी बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ, आता ओटीटीवर धडकणार; कधी अन् कुठे वाचा सविस्तर..

Sunny Deol Ameesha Patel Gadar 2 OTT Release : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा ‘गदर 2’ (Gadar 2) हा सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. त्यामुळे या चित्रपटाने सिनेमागृहासह बाॅक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवत धुमाकूळ घातली आहे. कमी कालावधीच या सिनेमाने 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे ‘गदर 2’ (Gadar 2) या सिनेमाची सिनेप्रेमींमध्ये चांगलीच क्रेझ निर्माण झाली आहे.

‘गदर 2’ ओटीटीवर कधी येणार? (Gadar 2 Release On OTT)
आता या चित्रपटाविषयी मोठी बातमी समोर आली आहे. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहाता, ‘गदर 2’चे निर्मात्याने म्हटले आहे की,”गदर 2’ हा सिनेमा आणखी दोन महिन्यांनी ओटीटीवर रिलीज होईल. अद्याप ओटीटी रिलीजची तारिख ठरलेली नाही. मात्र, दिवाळीच्या मुहुर्तावर हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात येईल. ‘झी 5’ (Zee 5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज होईल. त्यामुळे ‘गदर 2’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी थोडे दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. सिनेमागृहाप्रमाणे ओटीटीवरदेखील हा सिनेमा चांगलाच धमाका करेल”, असं मत व्यक्त करण्यात आलं आहे.

‘गदर’चा बॉक्स ऑफिसवर धमाका (Gadar 2 Box Office Collection)
‘गदर 2’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 40.1 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 43.08 कोटी, तिसरा दिवस 51.7 कोटी, चौथा दिवस 38.7 कोटी, पाचवा दिवस 55.4 कोटी, सहावा दिवस 32.37 कोटी, सातवा दिवस 23.28 कोटी, आठवा दिवस 20.5 कोटी, नववा दिवस 31.07 कोटी, दहावा दिवस 38.9 कोटी आणि अकराव्या दिवशी 13.5 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या 11 दिवसांत आतापर्यंत या सिनेमाने 388.6 कोटींचा गल्ला जमवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये