संभाजी भिडेंना भाजपच्या नेत्यांचा पाठिंबा? शिंदे गटाच्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “भिडेंचा भाजपशी संबंध…”
मुंबई | Sambahji Bhide – संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महात्मा गांधी यांचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असं सांगितलं जातं. पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसंच त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. सोबतच भिडेंवर कारवाई करण्याची देखील मागणी केली जात आहे. अशातच आता भिडेंना भाजपच्या (BJP) नेत्यांचा पाठिंबा असल्याचा आरोप केला जात आहे, त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
या आरोपावर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, संभाजी भिडे हे स्वतंत्र असून त्यांचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाहीये. त्यांचा भाजपशी संबंध जोडणं हे योग्य नाहीये. त्यांनी केलेलं विधान हे गृहखात्याकडून तपासून बघितलं जाईल त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल.
संभाजी भिडेंची एक वेगळी संघटना आहे. त्यांची संघटना मुलांना गडावर घेऊन जाते आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल माहिती देते. हे काम त्यांच्या संघटनेकडून स्वतंत्रपणे केलं जातं. त्यामुळे भाजपशी त्यांचा संबंध नसून तो जोडणं योग्य नाहीये, असंही दीपक केसरकरांनी सांगितलं.