अनिल देशमुखांना मोठा दिलासा? सर्वोच्च न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश!

नवी दिल्ली : (Supreme Court relief to Anil Deshmukh) गेली अनेक महिन्यापासून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांना १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितले, असल्याच्या आरोपाखाली सध्या देशमुख अर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.
दरम्यान, देशमुख यांच्या बाजूने गेली अनेक माहिन्यापासून एकही निर्णय येत नव्हता मात्र, आज सवोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे त्यांना मोठा आधार मिळाला आहे. अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी तातडीनं सुवानणी पूर्ण करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हायकोर्टाला दिले आहेत.
याशिवाय याच आठवड्यात सुनावणी घेण्यासही न्यायालयाने सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्देशामुळे एक प्रकारे हा देशमुखांसाठी दिलासा मानला जात आहे. त्यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली आणि अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे हे प्रकरण काय आहे ते लवकरच समोर येणार आहे.