ताज्या बातम्या
महाविकास आघाडीची उद्या अग्निपरीक्षा, बहुमत चाचणीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय!

मुंबई : (Supreme Court ruled in favor majority trial) महाविकास आघाडी सरकारने बहुमत सिद्ध करावी अशी मागणी भाजपनं राज्यपालांकडे केली होती. त्यानंतर राज्यपालांनी एका दिवसात बहुमत सिद्ध करायला सांगितले. त्याला आव्हान देत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. गुरुवार दि. २९ रोजी तिन तासाच्या युक्तीवादानंतर अखेर गुरुवार दि. ३० रोजी बहुमत चाचणी घेण्याचा निर्णय देण्यात आला आहे.
दरम्यान, या निर्णयाकडे सर्व देशाचे लक्ष लागले होते. आता ठाकरे सरकार अडचणीत आले आहे आणि एकनाथ शिंदे गट कोणाला पाठिंबा देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.