मोठी बातमी! बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयानं दिली परवानगी

मुंबई | Bull-Cart Racing – नुकताच सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) बैलगाडा शर्यतीसंदर्भात (Bull-Cart Racing) मोठा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवली आहे. आज (18 मे) बैलगाडा शर्यतींच्या परवानगीबाबत सर्वोच्च न्यायालयानं अंतिम निकाल दिला आहे. त्यामुळे आता तामिळनाडूतील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या या निकालनंतर बैलगाडाप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
बैलगाडा शर्यतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालय आज काय निर्णय देणार याकडे सर्व बैलगाडाप्रेमींचं लक्ष लागलं होतं. अखेर आज न्यायालयानं बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानं बालगाडा शर्यतप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयानं तामिळनाडूतील जलीकट्टू (Jallikattu) , कर्नाटकातील कम्बाला (Kambala) वरील बंदीही हटवली आहे.
सर्वोच्च न्यायालयानं बैलगाडा आणि जल्लीकट्टू खेळांसंदर्भात महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. यासंदर्भातली सुनावणी डिसेंबर महिन्यात पूर्ण झाली होती. पण त्यावेळी याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. अखेर आज यासंदर्भातला निकाल न्यायालयानं जाहीर केला असून आता बैलगाडा शर्यती, जल्लीकट्टू आणि कम्बाला या खेळांना परवानगी दिली आहे. या खेळांमध्ये प्राण्यांचे हाल होत असल्याचा दावा प्राणीमित्र संघटनांनी केला होता.