भाजपने केलेले आरोप चुकीचे? ‘त्यांच्या’ कुटुंबियांची माफी मागा; सुप्रिया सुळे

मुंबई : (Supriya Sule On Maharashtra BJP) भाजपने राज्यातील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र, या नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना क्लिन चिट देण्यात आल्याचा आरोर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. भाजपने केलेले हे आरोप खोटे असतील तर त्यांनी नेत्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांची जाहिर माफी मागितली पाहिजे, असं विधान त्यांना पुण्यात केलं आहे. यासंदर्भात आपण लवकरच भाजपच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपा नेत्यांच्या आरोपांची आम्हाला सवय झाली आहे. शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडी कारवाईवरुन त्या म्हणाल्या, भारतीय जनता पार्टी ही सध्या ‘भारतीय जनता लाॅंड्री’ झाल्याचा आरोप त्यांनी केला. वेदांता-फाॅक्सकाॅन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. वेदांता कंपनीकडे किती टक्के मागितले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यांवर त्यांनी भाजपवर हे निशाणा साधलाय.

प्रताप सरनाईक यांच्यावर केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपानंतर टाॅप्स समूह घोटाळा प्रकरणाच्या आधारेच ईडीने सरनाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. परंतु महानगर दंडाधिकारी न्यायालयाने तपास बंद करण्याचा अहवाल स्वीकारल्याने त्यांच्यामागील लागलेला ईडीचा ससेमिरा थांबण्याची शक्यता आहे. प्रताप सरनाईक यांच्यासह भावना गवळी, आनंदराव अडसूळ, यशवंत जाधव, संजय राठोड, अर्जून खोतकर यांच्यावर उर बडवत कारवाईचे आरोप करणारे भाजपचे नेते आता चिडीचूप बसल्याचे पहायला मिळत आहेत.

Prakash Harale: