ताज्या बातम्यारणधुमाळी

“बायकांच्या गुलामीवर…”, संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर सुप्रिया सुळे संतप्त

मुंबई | Supriya Sule On Sambhaji Bhide Controversial Statement – शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. एका महिला पत्रकारानं कुंकू लावलं नसल्यानं संभाजी भिंडेंनी तिच्याशी बोलण्यास नकार दिला. “तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो”, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही संभाजी भिडेंवर संताप व्यक्त केला आहे.

सुप्रिया सुळे यांनी संभाजी भिडे यांच्यावर खोचक टीका केली आहे. त्यांनी फेसबुकला हेरंब कुलकर्णी यांची कविता शेअर केली आहे. या कवितेद्वारेच त्यांनी भिडेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

सुप्रिया सुळेंनी शेअर केलेली कविता-

तू आणि मी ….?
मी लावतो टिळा
तू लाव टिकली
परंपरेच्या बाजारात
अक्कल आम्ही विकली
मी लावतो भस्म
तू लाव कुंकू
गुलामीचा शंख
दोघे मिळून फुंकू
तू घाल मंगळसूत्र
मी घालतो माळ
मनूने मारलेली रेषा
मनोभावे पाळ
तू घाल बांगड्या
माझ्या हातात गंडा
मुकाट्याने ऐक नाहीतर
आमच्या हातात दंडा
मी घालतो मोजडी
तू जोडवे घाल
सप्तपदी च्या मर्यादेत
जन्मभर चाल
तू घाल अंबाडा
मी शेंडी राखतो
विज्ञानाच्या प्रगतीला
परंपरेने झाकतो
मी घालतो टोपी
तू घाल बुरखा
बायकांच्या गुलामीवर दोन्हीकडे
एकमत आहे बर का…!!!
मी धोतरात, तू शालूत
होऊ परंपरेचे दास
साने गुरुजी ते भिडे गुरुजी
महाराष्ट्राचा प्रवास …..!!!!!

-हेरंब कुलकर्णी

https://www.facebook.com/supriyasule

दरम्यान, काल (2 नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संभाजी भिडेंशी संवाद साधला. यामध्ये एका मराठी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकारानं संभाजी भिडेंना प्रश्न विचारला, ‘तुम्ही आज मंत्रालयात कोणाची भेट घेतली?’ यावर “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रूप आहे. भारत माता विधवा नाही”, असं वक्तव्य भिडे यांनी केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये