“कुणीही यावं अन् टपली मारून जावं…”, सुप्रिया सुळेंचं शिंदे सरकारवर टीकास्त्र

मुंबई | Mahavikas Aghadi Mahamorcha – मागील काही दिवसांपासून सत्ताधाऱ्यांकडून महापुरूषांबाबत होत असलेली वादग्रस्त वक्तव्य आणि राज्यातील इतर प्रश्नांवर महाविकास आघाडीकडून आज (17 डिसेंबर) महामोर्चा (Mahavikas Aghadi Mahamorcha) काढण्यात येणार आहे. या मोर्चात मित्रपक्ष देखील सहभागी होणार आहेत. मात्र, या मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी काही अटींच्या आधारे मोर्चाला लेखी परवानगी दिली आहे. या मोर्चातून सरकारचा निषेध केला जाणार आहे. तसंच भाजपकडूनही (BJP) या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून ‘माफी मांगो आंदोलन’ केलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. यादरम्यान, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिंदे सरकारवर (Shinde Government) हल्लाबोल केला आहे.
“एखाद्यानं कुठलीही चूक एकदा केली तर ठीक आहे, दोनदा केली तर ठीक आहे. पण पुन्हा पुन्हा चूक कशी होते? ती चॉईस असते, मग ती चूक नसते”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुढे त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी (CM Basavraj Bommai) केलेल्या वक्तव्यांवरून सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली. “राज्यपालांनी अद्यापही दिलगिरी व्यक्त केलेली नाही. त्यामुळे निवडकपणे दिलगिरी व्यक्त केली जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्रीही एवढा हल्लाबोल करत असताना महाराष्ट्रातल्या कुणी काहीही केलं नाही. सगळे शांत बसले होते. अमित शाह यांच्याकडे आम्ही गेलो होतो. खरंतर अमित शाह (Amit Shah) यांनी मध्यस्थी केल्यामुळे त्यांचे आभार मानले पाहिजेत. नाहीतर आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हातावर हात ठेवून बसले होते. त्यांनी दिल्लीला जायला नको होतं का?” असा सवालही सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.
“कर्नाटकला आपले मंत्री जाणार होते, मग त्यांचा दौरा रद्द का केला? कारण ते घाबरतात. त्यांनी बोटचेपी भूमिका स्वीकारली आहे. त्यांना स्वाभिमान नाहीये. त्यांना फक्त सत्ता हवीये आणि त्यासाठी ते काहीही करतील. महाराष्ट्रच नव्हे, भारतातल्या कुठल्याही महापुरुषाबाबत कुणी चुकीचं काही बोलत असेल, तर ते वाईटच आहे. आपण सगळ्यांनी मिळून त्याचं खंडन केलं पाहिजे. कुणीही यावं आणि टपली मारून जावं, नही चलेगा”, असा इशाराही सुप्रिया सुळेंनी दिला.




2 Comments