कहाणीत नवा ट्विस्ट! सलीम कुत्ता प्रकरणात गिरीश महाजन गोत्यात, अंधारेंनी व्हिडिओ आणला समोर
नागपूर : (Sushama Andhare On Girish Mahajan) मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी सलिम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा फोटो भाजप आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी विधानसभेत दाखवला. त्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली.
पण यावरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नितेश राणे यांना चांगला अभ्यास करण्याचा खोचक सल्ला देत त्यांनी दाखवलेल्या पार्टीचा एक व्हिडिओच समोर आणला यामध्ये भाजपचे नेते गिरीश महाजन उपस्थित असल्याचं दिसून येत आहे.
अंधारे यांनी यासंदर्भात म्हटलं की, “देवेंद्र फडणवीस यांची बिग्रेड अभ्यास करत नाही. नितीश राणे यांनी आज एक फोटो सभागृहात झळकला. दाऊदच्या नातेवाईकांच्या लग्नातले जे फोटो दाखवले ते दोन वर्षांपूर्वीचे आहेत. नितेश राणे यांनी फोटो दाखवला मी संपूर्ण व्हीडीओ दाखवते. यामध्ये भाजप नेते मंत्री पालकमंत्री गिरीश महाजन, विकांत चांदवडकर, बाळासाहेब सानप दिसत आहेत”
या पार्टीत आमचा कोणी नेता असेल तर कारवाई करा पण बाकी पण त्यात कोण आहे ते पण पहा. दोन वर्षांपूर्वी महाजन यांच नाव वगळलं जाणार असं सागितलं जातंय अशा बातम्याही त्यावेळी झाल्या होत्या.
नितेश राणेंनी तो व्हिडिओ देखील पाहवा. गिरीश महाजन यांना कोणी सागितलं नाही का? ते का गेले होते, महाजन यांना कोणी विचारत नाहीये का? फडणवीसांनी याची पण माहिती घ्यावी आणि दोषी असेल तर कारवाई करावी. कारण या पार्टीत आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे हे सगळे उपस्थित होते. याची पण चौकशी करा.