ताज्या बातम्यारणधुमाळी

“नारायण राणेंची दोन बारकी-बारकी पोरं…”, सुषमा अंधारेंची मिश्कील टिपण्णी

कोल्हापूर | Sushama Andhare – राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांची दोन मुलं निलेश राणे (Nilesh Rane) आणि नितेश राणे (Nitesh Rane) अनेकदा उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका करताना दिसतात. तसंच राणे पिता-पुत्रांनी अनेकवेळा उद्धव ठाकरेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी राणे पिता-पुत्रांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. कोल्हापूर येथे महाप्रबोधन यात्रेत त्या बोलत होत्या.

यावेळी सुषमा अंधारेंनी नारायण राणे (Narayan Rane) यांच्या दोन मुलांचा ‘बारकी बारकी पोरं’ असा उल्लेख केला आहे. त्यांनी केलेल्या या खोचक टोल्यामुळे व्यासपीठावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. यादरम्यान, अंधारेंनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची महिलांबद्दल असलेल्या मानसिकतेवरूनही टीका केली आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काहीच कारवाई करत नाहीत, असं अंधारेंनी म्हटलं आहे.

राणे पिता-पुत्रांवर टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “नारायण राणेंची जी दोन बारकी-बारकी पोरं आहेत, त्यांनी अनेकदा मातोश्रीवर टीका केली. मी बारक्या लेकरांबद्दल फार काही बोलत नाही. अजिबात बोलत नाही. पण ती जी दोन बारकी-बारकी लेकरं आहेत ना त्यांची उंची नसताना मातोश्रीवर गरळ ओकली आहे. मी त्यांच्या बौद्धिक उंचीबद्दल बोलतेय. पण देवेंद्र फडणवीसांची त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत झाली नाही”, अशी टीका अंधारेंनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये