ललित मोदींच्या पोस्टनंतर सुष्मिता सेनची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

मुंबई | बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तसंच ललित मोदी देखील चांगलेच चर्चेत आले आहेत. ललित मोदी यांनी शेअर केलेल्या डेटिंगच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. काल (गुरूवार) ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतच्या नात्याबद्दलची एक पोस्ट शेअर केली होती. त्यावर आता सुष्मिता सेननं प्रतिक्रिया दिली आहे.
सुष्मिता सेननं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. मी सध्या आनंदी आहे. मी लग्न केलेलं नाही. साखरपुडा देखील केलेला नाही. मी सध्या प्रेमळ माणसांच्या सानिध्यात आहे. हे माझं स्पष्टीकरण आहे, आता तुम्ही स्वत:चं आयुष्य जगा आणि काम करा. माझा आनंद शेअर केल्याबद्दल धन्यवाद. ज्यांनी शेअर केला नाही त्यांच्यासाठी ‘None Of Your Business’, असं कॅप्शन सुष्मितानं या पोस्टला दिलं आहे.
दरम्यान, ललित मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सुष्मिता सेनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं. ललित मोदी यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्यांनी सुष्मिताचा उल्लेख बेटरहाफ असा केला. ललित मोदी यांनी पोस्ट केलेले फोटो पाहून दोघांचा साखरपुडा झाला आहे, असं म्हटले जात होतं. फोटोमध्ये सुष्मिता सेनच्या बोटात अंगठी दिसत आहे. पण आता या सर्व चर्चेवर सुष्मितानं रिअॅक्शन दिली. सुष्मिता सेन आणि ललित मोदी नुकतेच मालदिव आणि सार्डिनिया येथे फिरायला गेले होते. ललित मोदी लंडनमध्ये पोहचल्यानंतर ट्विट करत सुष्मिता सेनसोबतच्या नात्यांची माहिती दिली.