ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

जयंत पाटलांना ‘निर्लज्ज’पणा भोवला! विधानसभा अध्यक्षांनी केली निलंबनाची कारवाई…

मुंबई : (Suspension action against Jayant Patil) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली आहे. नागपूर (Nagpur) येथे सुरु असलेलं हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत त्यांचं निलंबन असेल. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जयंत पाटील यांनी निलंबन करण्याचा ठराव मांडला.

विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील सभागृहात संतापले होते. या संतापात जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभा अध्यक्षांना (Maharashtra Assembly Winter Session) असंसदीय शब्द वापरला होता. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याची मागणी केली. या गदारोळानंतर विधानसभेचे कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगितही करण्यात आले.

सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. जयंत पाटील यांनी बेजबाबदारपणे वक्तव्य केलं असून त्यांना नागपुर अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात यावे, तसंच त्यांच्या वक्तव्यावर चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात यावी, असा ठराव चंद्रकांत पाटील यांनी मांडला. हा ठराव बहुमताने मंजूर झाल्यानंतर जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर जयंत पाटील यांनी सभागृहाचा त्याग केला. त्यामुळे पुढे काय निर्णय घेण्यात येतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये