धक्कादायक ! रायगडमध्ये आढळली AK-47 असलेली बोट; दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी कटाची शक्यता?

रायगड – Suspicious Boat Found In Raigad : रायगड मधील श्रीवर्धन तालुक्यामध्ये हरिहरेश्वर आणि भरडखोल मध्ये दोन संशयास्पद बोटी स्थानिक मच्छीमारांना आढळून आल्या आहेत. हरिहरेश्वर मध्ये आढळलेल्या बोट मध्ये AK-47 आढळल्याची माहिती आहे तर भरडखोलमध्ये सापडलेल्या बोट मध्ये लाईफ जॅकेट आणि इतर काही साहित्य आढळले आहे. या घटनेमुळे परिसरात एकूणच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुप्तता बाळगली आहे. त्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे. या घटनेनंतर परिसरात अलर्ट जारी केले आहे.

रायगडमधील श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर आणि भरडखोल येथील समुद्र किनाऱ्यावर दोन संसयास्पद बोटी सापडल्या आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. हरिहरेश्वरला आढळलेल्या बोटीमध्ये तीन AK-47 आणि २२५ राऊंड्स गोळ्या आढळल्या असून भरडखोल किनाऱ्यावर सापडलेल्या बोटीत लाईफ जॅकेट आणि काही दारुगोळा आढळले आहे. या बोटींसंबंधित कोणतीही व्यक्ती आढळलेली नाही.

गृहमंत्रालयाकडून हाय अलर्ट

घटनेची माहिती मिळाल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबतची माहिती दिली आहे. ते म्हणाले, “सदरील घटना निदर्शनास आल्यानंतर परिसरात नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सणांचे दिवस असल्याने सर्व पोलिसांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. बोटीमध्ये तीन AK-47 आणी काही दारुगोळा आढळला आहे. प्राथमिक माहितीनुसार सदर बोट ऑस्ट्रेलियातील नागरिकाच्या मालकीची आहे. बोटीमध्ये संबंधित कागदपत्रे हाती लागले आहेत. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे दुर्घटनाग्रस्त अवस्थेत बोट वाहून आली असल्याची माहिती पोस्टगार्ड कडून मिळाली आहे. ” अशी माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Dnyaneshwar: