ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आता स्विगीनंही कर्मचाऱ्यांना दिला नारळ; सीईओ म्हणाले, “हा निर्णय आमच्यासाठी…”

नवी दिल्ली | Swiggy Layoff – सध्या संपूर्ण जगावर बेरोजगारीचं संकट कोसळायला सुरुवात झाली आहे. अनेक बड्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांमध्ये कपात करायला सुरूवात आहे. अशातच आता भारतातील फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीनं (Swiggy) देखील कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे.

स्विगीनं (Swiggy) 380 कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली आहे. हा आमच्यासाठी मोठा निर्णय असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. स्विगीमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. तसंच हा निर्णय आमच्यासाठी कठीण निर्णय असल्याचं स्विगीच्या (Swiggy) सीईओंनी म्हटलं आहे.

स्विगीचे सीईओ श्रीहर्ष मजेटी यांनी कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना याबाबत ई-मेल केला आहे. सर्व शक्यतांचा विचार करुन याबाबत निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे. तसंच त्यांनी कर्मचाऱ्यांची छाटणी करण्यामध्ये अनेक कारणं सांगितली आहेत. यासाठी त्यांनी माफी देखील मागितली आहे.

कर्मचारी कपातीचा निर्णय घेताना स्विगीनं विविध कारणांचा उल्लेख केला आहे. सध्या कंपनीसमोर आव्हानात्मक मायक्रोइकॉनॉमिक स्थिती आहे. कंपनी अनेक आव्हानांचा सामना करत आहे. फूड डिलिव्हरी क्षेत्रात वाढीचा दर कमी झाल्यामुळे नफ्यावरही परिणाम झाला आहे. स्विगीकडं स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी पुरासा निधी असल्याचं मात्र कंपनीनं स्पष्ट केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये