क्रीडा
विराट कोहलीच्या फेक फिल्डिंगवरून वाद

अॅडिलेड : भारताने बुधवारी बांगलादेशविरुद्ध महत्त्वपूर्ण विजयाची नोंद केली. या विजयानंतर बांगलादेशचा संघ क्रिकेटपटू विराट कोहलीच्या क्षेत्ररक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. बांगलादेशी यष्टिरक्षक नुरुल हसन म्हणाला- ‘कोहलीने सामन्यादरम्यान फेक फिल्डिंग केले. दंड न ठोठावल्याबद्दल त्याने अम्पायरवरही प्रश्न उपस्थित केला आहे.
हे आरोप गंभीर आहेत कारण अंपायरने दंड ठोठावला असता तर बांगलादेशच्या खात्यात ५ धावा जमा झाल्या असत्या. असे झाले असते तर भारताने ५ धावांनी जिंकलेला सामना अनिर्णित राहिला असता आणि सामना सुपर ओव्हरमध्ये जाऊ शकला असता.