क्रीडाराष्ट्रसंचार कनेक्ट

झिम्‍बाब्‍वेला धक्‍का; नेदरलँडचा विजय

अ‍ॅडलेट : टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेत आज ग्रुप -२ मध्‍ये झिम्बाब्वे विरुद्ध नेदरलँड संघ ओव्‍हलच्‍या मैदानावर आमने-सामने आले. झिम्‍बाब्‍वेने प्रथम फलंदाजी करत नेदरलँडला ११८ धावांचे लक्ष्‍य दिले. मॅक्‍स ओडाडच्‍या अर्धशतकी खेळाच्‍या जोरावर नेदरलँडने हे लक्ष्‍य सहज साध्‍य करत पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला. नेदरलँडचा या स्‍पर्धेतील हा पहिलाच विजय आहे. तर पराभवामुळे झिम्‍बाब्‍वे संघाला सेमी फायनलपर्यंत पोहचण्‍याच्‍या प्रयत्‍नाला मोठा धक्‍का बसला आहे.

११७ धावांच्‍या लक्ष्‍याचे पाठलाग करणार्‍या नेदरलँडचा सलामीवीर स्‍टीफक मायबर्ग चौथ्‍या षटकाच्‍या दुसर्‍या चेंडूवर ८ धावांवर बाद झाला.पहिली विकेट गमावल्‍यानंतर नेदरलँडच्‍या मॅक्‍स ओडाड आणि टॉम कपूर यांनी संयमित खेळीचे प्रदर्शन घडवत डाव सावरला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये