केएलचा थ्रो ठरला टर्निंग पॉइंट
अॅडलेट : टी-२० विश्वचषकाच्या चौथ्या सामन्यात भारतीय सलामीवीर के. एल. राहुलला फलंदाजीमध्ये लय गवसल्याचं दिसून आलं. पहिल्या तीन सामन्यामध्ये दुहेरी धावसंख्याही गाठता न आलेल्या के. एल. राहुलने या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं. केवळ फलंदाजीच नाही तर क्षेत्ररक्षणामध्येही के. एल. राहुलने लिटन दासला धावबाद करत मोलाची भर घातली. लिटन दासने २१ चेंडूंमध्ये ५० धावांची वेगवान खेळी केली. मात्र तुफान खेळीदरम्यान एक चोरटी धाव घेण्याच्या नादात लिटन धावबाद झाला. लिटनला धावबाद करण्यामध्ये राहुलचा भन्नाट थ्रो कारणीभूत ठरला. लिटनच्या विकेटनंतर सामन्याला कलाटणी मिळाली.
झालं असं की १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने पहिल्या सात षटकांमध्ये नाबाद ६६ धावांपर्यंत मजल मारली. अॅडलेडमध्ये पाऊस सुरु झाल्याने सामना थांबवण्यात आला. मात्र सामना थांबवण्यात आला त्या क्षणी डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीनुसार बांगलादेश हा निर्धारित धावसंख्येहून १७ धावांनी आघाडीवर होता.