सर्व्हर डाऊनमुळे खोळंबा; तलाठी भरती परिक्षेच्या पेपरची वेळ बदलली
राज्यातील अनेक जिल्ह्यात तलाठी भरतीची परीक्षा आज (२१ ऑगस्ट) पार पडत आहे. मात्र राज्यातील संभाजीनगर, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यात परीक्षेआधीच सर्व्हर डाऊन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यानंतर तलाठी पेपरच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे.
ज दुपारी 12.30 ते 2.30 या वेळेत होणाऱ्या पेपरचे वेळपत्रक बदलण्यात आले आहे. हा पेपर आता 2 ते 4 या वेळेत होणार होणार आहे. पुण्यातील तलाठी परिक्षेच्या सेंटर्सवर हे बोर्ड लावले आहेत. या परीक्षेसाठी सकाळी ९ ते ११ ही परीक्षेची वेळ होती. मात्र अचानक सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांची नोंदणी बंद पडली. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची वेळ होऊन देखील परीक्षा केंद्राबाहेरच थांबवे लागले.
राज्यातील अनेक जिल्ह्यात हाच प्रकार समोर आला असून यामुळे परीक्षा केंद्रांच्या बाहेर परीक्षेसाठी दुरून आलेल्या हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला. राज्यात अनेक ठिकाणी हीच परिस्थिती दिसून आली. नागपुरात तलाठी भरती परिक्षेत सर्व्हर डाऊन झालं. नागपुरातच नाही तर अकोला, अमरावती, लातूरमध्येही हीच परिस्थिती दिसून आली होती.