“गर्भपाताच्या घटनांमुळे बीड जिल्हा फेमस”; आरोग्यमंत्र्यांचे आवमानजनक वक्तव्य!

मुंबई : (Tanaji Samant On Statement Beed District) बुधवार दि. 17 ऑगस्टपासून राज्यातील निधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. आज दुसऱ्या दिवशी विरोधकांनी सरकारला आणि त्यांच्या मंत्र्यांना चांगलेच कात्रीत पकडण्याचा चंग बांधल्याचे दिसून आले. विरोधकांनी पुरवणी मागणी प्रश्नावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना शिंदेंच्या मंत्र्यांना नाकेनऊ येताना दिसून आले.

दरम्यान, विरोधकांनी राज्यातील कोलमडलेल्या आरोग्य सेवांवरून प्रश्नांचा अक्षरक्षः भडीमार केल्याने उपस्थित प्रश्नांना उत्तरं देताना आरोग्य मंत्री तानाजी सावंतांची भांबोरी उडाली. बीड येथील स्त्री भृण हत्या प्रश्नी उत्तर देताना गर्भपाताच्या घटनांमुळे बीड जिल्हा हा ‘फेमस’ असल्याचे सावंत म्हणाले. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटाच्या आमदारात खडाजंगी उडाली.

बीड तालुक्यातील बक्करवाडी येथील एका महिलेचा अवैध गर्भपातामुळे मृत्यू झाला होता. या प्रश्नावर उत्तर देताना, गर्भपाताच्या घटनांमुळे बीड जिल्हा हा फेमस (लोकप्रिय) आहे, असं उत्तर तानाजी सावंत यांनी दिलं. त्यांच्या उत्तरावर शिवसेना आमदार सुनिल प्रभू यांनी तीव्र आक्षेप घेतला, यानंतर सावंतांच्या मदतीला शंभूराज देसाई उठले, अजित दादांनी यात हस्तक्षेप करत फेमस हा शब्द बीड जिल्ह्याचा अपमान करणारा असून तो कामकाजातून वगळण्यात यावा अशी सूचना केली, या सूचनेचा विचार केला जाईल असं आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी दिलं. एखाद्या मंत्र्याने जिल्ह्याचा आपमान होईल असे वक्तव्य सभागृहात करणे हे निंदनीय आहे हे मात्र नक्की.

Prakash Harale: