ताज्या बातम्या

हिवाळ्यात घ्या गरमागरम सूपची मजा

Best Soups : हिवाळा अनेकांना आवडतो. या कडाक्याच्या थंडीत चहा, गरमागरम नाश्ता हवाहवासा वाटतो. त्यात साध्या जेवणापेक्षाही चटपटीत खाण्याचा मोह या दिवसांत आवरत नाही. आणि चटपटीत जेवणाची सुरूवात जर चटपटीत सूपने होत असेल तर मग चंगळच! अशाच चटपटीत तरीही हेल्दी सूप हिवाळ्यात नक्की आस्वाद घ्यावा. सर्वात महत्वाचे नहाबजे पावसाळा संपून हिवाळा सुरू होताना गारठा वाढल्याने अनेकांना सर्दी-खोकला होण्याचीही शक्यता असते. आपले शरीर नव्याने येणाऱ्या ऋतूशी जुळवून घेत असल्याने या सगळ्या बदलांना आपल्याला सामोरे जावे लागते.अशावेळी लगेच डॉक्टरांकडे औषधे घेण्यापेक्षा सूप पिणे केव्हाही उत्तम. यामुळे घशाला आराम मिळतो, गरम खाल्ल्याचा आनंद मिळतो आणि शरीराचे पोषण होण्यासही मदत होते.

टोमॅटो सूप

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हिवाळ्यात टोमॅटो सूप भरपूर प्रमाणात घ्यावे. आजारी माणसांनाही अनेकदा टोमॅटो सूप घेण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय वजन कमी करण्यासाठीही टोमॅटो सूप फायदेशीर ठरते.

image 3 10

स्वीट कॉर्न सूप

हिवाळ्याच्या दिवसात स्वीटकॉर्न भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे त्याचा आरोग्यासाठी फायदा करून घेतलाच पाहिजे. स्वीटकॉर्नमध्ये असलेले फायबरचे गुणधर्म हे पचन शक्तीला मजबूत करण्याचे काम करतात. त्यामुळे हे सूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

image 3 11

मिक्स व्हेजिटेबल सूप

मिश्र भाज्यांचे सूप प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. या प्रकारचे सूप प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. भाज्यांचे सूप प्यायल्यानेही कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते. मिक्स व्हेजिटेबल गार्लिक सूप प्यायल्याने हृदयालाही खूप फायदा होतो.  

image 3 12

पालक सूप

पालकमध्ये अनेक पोषक घटक असतात. पालक लोह, कॅल्शियम, सोडियम, क्लोरीन, फॉस्फरस, खनिजे, प्रथिने, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी सारख्या पोषक घटकांने समृद्ध आहे. पालक सूप एक स्वादिष्ट, निरोगी आणि क्रीमयुक्त डिश आहे.

image 3 13

बीट सूप

बीटमध्ये व्हिटॅमिन अ, ब, क आणि ई तसेच पोटॅशियम, मेग्नेशियम, कॅल्शियम आणि लोह यांचा समावेश असतो. यात लोहाचे जास्त प्रमाणात असल्यामुळे एनिमियाचा धोका कमी होतो. त्यामुळे लहान मुलांसाठी सुद्धा हे अतिशय फायदेशीर आहे.

image 3 14

मशरुम सूप

मशरूममध्ये रिबोफ्लॅविन(बी२), निअॅसीन(बी३), फोलेट पॅन्टोथेनिक अॅसिड, बायोटीन ही पोषकतत्त्वे असतात. याव्यतिरिक्त, हिवाळ्यात होणार्‍या रोगांपासून दूर राहण्यासाठी मशरूम सूपचे सेवन करणे चांगले आहे. रोज मशरूमचे सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

image 3 15

मुगाचे सूप

मुगाचे सूप हा एक चवीला उत्कृष्ट आणि आरोग्यदायी खाद्य पदार्थ आहे. विशेष म्हणजे ही ग्लूटेन फ्री डिश आहे. पोट खराब असले तरीही हे प्रथिनेयुक्त मसूरचे सूप सहज पचले जाऊ शकते. मुग डाळीचे सूप पिऊन वजन देखील कमी करता येऊ शकते.

image 3 16

लिंबू कोथिंबीर सूप

लिंबू हा व्हिटॅमिन सीचा मुख्य स्त्रोत आहे. चवीला आंबट असला तरी लिंबामुळे हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. संध्याकाळच्या वेळेत वातावरणातील गारवा जास्त जाणवतो, त्यावेळी ह्या गरमागरम लिंबू कोथिंबीर सूपाचा आस्वाद नक्की घ्यावा.

image 3 17

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये