पिंपरी चिंचवड

नवीन आढळणा-या मालमत्तांसाठी कर आकारणीची कार्यपध्दती जाहीर

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अत्याधुनिक ड्राेनच्या माध्यमातून शहरातील नवीन, वाढीव आणि वापरात बदल झालेल्या अशा मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणामुळे मालमत्तांची अचूक माहिती आणि करयाेग्य मूल्य निश्चित केले जाणार आहे. नव्याने आढळणा-या मालमत्तांसाठी पालिकेच्या वतीने कर आकारणीची कार्यपध्दती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या सहा वर्षांपासून मालमत्ताधारकांना कराची आकारणी केली जाणार आहे. मात्र, मालमत्ता कधी उभारली, याची याेग्य कागदपत्रे सादर केल्यास तेव्हापासूनच कराची आकारणी केली जाणार असल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत इमारत व जमिनीवर मालमत्ता कराची आकारणी व वसुली कार्यवाही करण्यात येते. त्यानुसार शहरातील कर कक्षेत नसलेल्या मालमत्तांना कर कक्षेत आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने मे. स्थापत्य कन्सल्टंट प्रा. लि. कंपनी मार्फत ड्राेनच्या सहाय्याने सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणात नविन, वाढीव, वापरात बदल अशा मालमत्ता आढळणार आहेत. या मालमत्तांसाठी कर आकारणीची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. आढळलेल्या इमारत, माेकळ्या जमीन यांना सुलभ व सलग क्रमांक देण्यात येणार आहेत. सर्व मालमत्तांची अंतर्गत बिनचूक मोजमाप हाेणार आहे. मालमत्तेचे चटई क्षेत्र (कारपेट) घेण्यात येणार असून त्यावर २० टक्के बिल्टअप आकारले जाणार आहे.

मालमत्तेची मोजमापे चौरस मीटर पद्धतीने हाेणार आहे. कर आकारणीसाठी मालमत्तेचा बांधकाम दर्जा, वापर, क्षेत्रफळ विचारात घेण्यात येणार आहे. तसेच मालमत्ता अधिकृत किंवा अनधिकृत आहे, याचीही माहिती घेतली जाणार आहे. सामान्य करातील सवलतीच्या माहितीचे संकलन, मालमत्तांची विवरणपत्रात माहिती भरून घेण्यात येणार आहे. विवरण पत्रावर मालमत्तेमध्ये उपस्थित असलेल्या मालक, भोगवटादार, प्रतिनिधी यांची स्वाक्षरी घ्यावयाची आहे. तसेच स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यास तसे नमूद केले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये