क्रीडादेश - विदेश

टीम इंडिया पहिल्यांदाच फेव्हरेट नाही : हर्षा भोगले

नवी दिल्ली : समालोचक हर्षा भोगले यांच्या मते टी २० विश्वचषकामध्ये भारतीय संघ हा जेतेपदाचा प्रबळ दावेदार नाही. गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच असे घडले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये टी २० विश्वचषकाला सुरुवात झाली असून, प्रत्येक जण आपापली मते मांडत आहे. टी२० विश्वचषकाला १६ तारखेपासूनच सुरुवात झाली असून पात्रता फेरीतील सामने सुरु आहेत. सुपर -१२ मध्ये पोहचण्यासाठी आठ संघ आपापसांत लढत असून त्यापैकी दोन संघ हे कालच पोहचले आहेत.

यात श्रीलंका आणि नेदरलँड्सचा समावेश आहे. आज वेस्ट इंडीज, आयर्लंड, झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड या चार संघांपैकी दोन संघ सुपर-१२ मध्ये पोहचतील. टी२० विश्वचषक २०२२ या विश्वचषकाबद्दल क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी आगामी आपापली मतं मांडली आहेत. पण या विश्वचषकासाठी भारतीय संघ प्रबळ दावेदार नसल्याचे समालोचक भोगले यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये