क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

शुभमन की ऋतुराज? आफ्रिकेविरोधात टीम इंडियाचे 11 शिलेदार कोण?

Team India Playing 11 : भारत आणि दक्षिण अफ्रिका (IND vs SA) यांच्यादरम्यान दुसरा टी 20 सामना आज होणार आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दोन्ही संघ सेंट जॉर्ज पार्क मैदानात आमने सामने असतील. या सामन्यात भारताची प्लेईंग 11 कशी असेल? सलामीला कोण उतरणार? याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय. या प्रश्नाचे उत्तर काही तासांत मिळणार आहे.

खेळपट्टी कशी आहे ?
सेंट जार्ज पार्क मैदानात आतापर्यंत फक्त तीन टी 20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. दोन सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवलाय. तर एका सामन्यात धावांचा पाठलाग करत विजय मिळवण्यात आलाय. या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या 179 इतकी आहे. या मैदानाची खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी आहे. वेगवान गोलंदाज प्रभावी ठरु शकतात.

दीपक चाहर अद्याप भारतातच
बॉलिंग ऑलराऊंडर दीपक चाहर अद्याप संघासोबत जोडला नाही. कुटुंबातील सदस्य रुग्णालयात दाखल असल्यामुळे चाहर अद्याप संघासोबत जोडला नाही. अशा स्थितीत तो दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध नाही. सुत्रांच्या वृत्तानुसार, तो टी 20 मालिकेतून माघार घेऊ शकतो.

सलामीला कोण ?
यशस्वी जैस्वालने आपल्या फलंदाजीची आक्रमकता दाखवली आहे आणि शुभमन गिल आता सर्व फॉरमॅटमध्ये पहिली पसंती बनला आहे, तर ऋतुराज गायकवाडला 52 चेंडूत 100 धावा केल्यानंतर दुर्लक्ष करणे कठीण होईल. अडचण अशी आहे की जैस्वाल, गिल आणि गायकवाड यांच्यापैकी सलामीला कोण उतरणार? या प्रश्नाच उत्तर चाहत्यांना नाणेफेकीनंतरच मिळेल.

दक्षिण अफ्रीका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा टी20 स्क्वॉड
सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जाडेजा (उपकर्णधार), वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चाहर.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये